बदली होताना आपल्या सोईनुसार हव्या त्या शाळेवर नियुक्ती मिळावी किंवा या बदलीतून सूट मिळावी, यासाठी बदलीपात्र शिक्षकांनी आता अनोखे फंडे वापरायला सुरुवात केली आहे. कोणी बोगस घटस्फोट दाखवत आहे तर कोणी हृदयशस्त्रक्रिया झाल्याचे सांगतोय, आणि हा सगळा प्रकार घडतोय शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात..